21 January 2025 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Aryan Khan Case BJP Connection | भीषण षडयंत्र? | ते NCB'त नाहीत पण भाजपशी संबंध | कोणाचे आशीर्वाद?

Aryan Khan Case BJP Connection

मुंबई, ०६ ऑक्टोबर | एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला (Aryan Khan Case BJP Connection) आहे. विशेष म्हणजे एनसीबीनेही तो आपला अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याचं म्हटलंय आणि त्यानतंर ANI’ने देखील अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.

Aryan Khan Case BJP Connection reveals explosive information. A selfie has been taken with him. The selfie went viral, he is not an NCB official, claimed Nawab Malik. It is noteworthy that the NCB has also stated that it is not its officer or employee and since then ANI has also given official information :

काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Aryan Khan Case BJP Connection reveals explosive information.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x