22 December 2024 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मनसुख हिरेन प्रकरणी परमबीर सिंग ATS'च्या पत्रांना रिप्लाय देत नव्हते | मोठा खुलासा

ATS investigation, Mansukh Hiren case, Parambir Singh

मुंबई, ०१ एप्रिल: सध्या मनसुख हिरेन प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याभोवती देखील संशयाचे वादळ निर्माण होताना दिसत आहे. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता. जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्रकरण याआधीच उलगडलं असतं, परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चार पत्रही पाठवली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले.

तसेच एटीएसने अँटेलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांचा तपास करताना २५ फेब्रुवारीच्या ४५ दिवस अगोदरचे आणि घटनेच्या नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी मागितले होते, अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कोर्पिओ गाडी सापडली होती, ती १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान मुंबई पोलीस मुख्यालयात आणली होती अशी माहिती एटीएसला मिळाली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर याचा खुलासा होण्याची शक्यता होती. परंतु CCTV फुटेज तपासण्याचे आदेश एटीएसला मिळाले नाहीत, हे वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.

दरम्यान, अँटिलियाच्या बाहेर उभ्या स्कॉर्पियोमधून ज्या 20 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्या कांड्या या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याची पुष्टी केली आहे. या कांड्या कधी व कोठून खरेदी करण्यात आल्या याचे NIA ने स्पष्टीकरण दिले नाही. या कांड्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’ नावाच्या कंपनीत तयार केल्याचे तपासात समोर आले होते.

जिलेटिनच्या कांड्यावर नोंदलेल्या नावाच्या आधारे NIA लवकरच कंपनीच्या लोकांशी संपर्क साधून चौकशी करू शकते. यापूर्वी या कंपनीच्या मालकाचा जबाब नागपूर पोलिसांनी नोंदवला होता. जप्त केलेल्या कांड्यांवर कोणताही अनुक्रमांक नव्हता, परंतु NIA ने ज्या कांड्या काढल्या आहेत त्याच्या बॉक्सचा शोध घेतला तर या कांड्या कधी खरेदी केल्या आणि कुणी विकल्या याचा शोध लागू शकतो. प्रत्येक बॉक्सवर एक विशेष क्यूआर कोड असतो, ज्याचा रेकॉर्ड कंपनी जवळ असतो.

 

News English Summary: At present, there is a storm of suspicion surrounding former Commissioner of Police Parambir Singh in the Mansukh Hiren case. According to ATS sources, Mansukh Hiren’s murder would have been revealed earlier. If Mumbai Police had cooperated properly. A senior official in the Maharashtra ATS said the case would have been uncovered earlier, but the Mumbai police headquarters did not allow us to check the CCTV footage.

News English Title: ATS investigation on Mansukh Hiren case giving indirect indications against former Mumbai Police commissioner Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x