16 April 2025 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

औरंगाबाद | ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी | आरोपीला अटक

Crime Patrol

औरंगाबाद, २८ ऑगस्ट | औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.

औरंगाबादमध्ये ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीची धावत्या रिक्शातून उडी, आरोपीला अटक – Auto rickshaw driver arrested by Aurangabad police who tried to humiliate young girl :

तरुणी रिक्षातून पडल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्या मदतीसाठी धावले. तरुणीची अवस्था पाहून तिला धीर देत तिच्या कुटुंबियांना बोलावले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती स्थीर आहे तिला सध्या घरी पाठवण्यात आले. पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं होतं ?
औरंगाबादमध्ये आज (शनिवारी) भर दिवसा, शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान एक तरुणी रिक्षात बसली होती. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली.

दरम्यान, ही घटना सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यानची आहे. पण, प्रकरण मीडियात आल्यानंतर पोलिस जागे झाले. माध्यमांवर वृत्त पाहिल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी औरंगाबाद पोलिसांना विचारणा केली. तेव्हाच पोलिस कामाला लागले असे सांगितले जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Auto rickshaw driver arrested by Aurangabad police who tried to humiliate young girl.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या