21 January 2025 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

आयशा आत्महत्या प्रकरण | अखेर आरोपी पतीला राजस्थानातून अटक

Ayesha suicide case, Arif accused, Ayesha suicide case

मुंबई, ०२ मार्च: संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या गुजरातच्या आयशा आत्महत्या प्रकरणी अखेर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या पाली येथून त्याला पकडण्यात आले. 23 वर्षीय आयशाने साबरमती नदीमध्ये उडी घेण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट करून कुटुंबियांना पाठवला होता. हा व्हिडिओ केवळ गुजरातच नव्हे, तर देशभर व्हायरल झाला. तिच्या या टोकाच्या निर्णयावर महाराष्ट्रातून सुद्धा भावूक प्रतिक्रिया समोर आल्या. (Ayesha suicide case Arif accused in Ayesha suicide case arrested from Rajasthan)

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला होता पसार:
आयशाचा पती आरिफ खान राजस्थानच्या जालोर येथील रहिवासी आहे. आयशाने शनिवारी (28 फेब्रुवारी) एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड केला. त्यानंतर आत्महत्या केली. यानंतर पोलिस आरोपी पतीच्या घरी पोहोचले तेव्हा तो फरार झाला होता. आयशाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासूनच तो पसार झाला होता. पण, सोमवारी रात्री पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला पाली येथून अटक केली. (Ayesha’s husband Arif Khan is a resident of Jalore, Rajasthan. Ayesha recorded a video message on Saturday)

शिक्षणासह नोकरीही करत होती आयशा:
आयशा अहमदाबादच्या रिलीफ रोड येथील एसव्ही कॉमर्स कॉलेजातून अर्थशास्त्रात एम.ए. करत होती. सोबतच एका खासगी कंपनीत नोकरीला होती. 6 जुलै 2018 रोजी तिचा आरिफसोबत विवाह झाला. पण, 10 मार्च 2020 पासून आयशा आपल्या माहेरीच राहत होती. तिने आरिफवर छळाचे आरोप केले होते.

 

News English Summary: The accused husband of Gujarat’s Ayesha suicide case, which is being discussed all over the country, has finally been arrested. He was arrested from Pali in Rajasthan. Ayesha, 23, had shot a video and sent it to her family before jumping into the Sabarmati River. The video went viral not only in Gujarat but across the country. Maharashtra also reacted emotionally to her decision.

News English Title: Ayesha suicide case Arif accused in Ayesha suicide case arrested from Rajasthan news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x