महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अँपवर बंदी आणा - चित्रा वाघ

मुंबई, २४ ऑक्टोबर : मागील काही दिवसांत सोशल मीडियात नवी अँप कार्यरत झाली आहेत. ही अँप मुलींचे आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावरुन संकलित करतात आणि त्या फोटोंना मॉर्फ करुन अश्लील पद्धतीने वापरले जाते. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि असे प्रकार करणाऱ्या अँपवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केली. चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद (Union IT Minister Ravishankar Prasad) यांना पत्र पाठवून अँप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही apps द्वारे महिलांचे अश्लील पद्धतीने फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जाताहेत ज्याने महिलांचे चारित्र्यहनन होत आहे.
जी अतिशय गंभीर बाब आहे.
यासंदर्भात दूरसंचार मंत्री श्री रविशंकर प्रसाद जी यांना मेल व पत्राद्वारे या Apps वर बंदी आणावी ही मागणी केलीं. pic.twitter.com/BNYNpquIqh— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 23, 2020
मागील काही दिवसांत वेगवेगळ्या निमित्ताने आवाहन करुन फोटो मागवणारी सोशल मीडिया अँप वाढली आहेत. यातील काही अँप फोटोच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाविषयी भाष्य करतात तर काही अँप भविष्य वर्तविण्याचा दावा करतात. काही अँप अपलोड केलेल्या फोटोवरुन संबंधित व्यक्ती विशिष्ट वयात कशी दिसेल अथवा विशिष्ट कपड्यांमध्ये कशी दिसेल हे दाखवणारे फोटो तयार करुन देतात. आपल्याला हे फोटो सोशल मीडियावर स्वतःच्या अकाउंटमधून (टाइमलाइन) पोस्ट करण्याची संधी उपलब्ध असते. या फोटोंना ओळखीतली मंडळी मोठ्या संख्येने लाइक करतात, त्यावर कमेंट करतात. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेकजण फोटोंशी संबंधित अँपचा वापर करत आहेत, त्यात स्वतःचा फोटो अपलोड करत आहेत.
अनेक युझर गंमत म्हणून सोशल मीडियावरची अँप वापरतात. मात्र ही अँप त्यांची सेवा देण्याच्या बदल्यात तुमचा फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती यांचा अॅक्सेस मिळवतात. अथवा ही माहिती तुम्हाला अँपवर नोंदवण्यास भाग पाडतात. मिळालेल्या खासगी माहितीचा अँप नियंत्रकांकडून गैरवापर होत आहे. या प्रकारात सरसकट सर्व अँप नसली तरी अनेक सोशल मीडिया अँपमागील टीम गुंतल्या आहेत.
News English Summary: The vice president of Maharashtra division of BJP, Chitra Wagh on Friday wrote a letter to Union Minister Ravishankar Prasad seeking action against social media applications, which morph women’s photographs in an indecent way. “I want to bring in to your notice that some apps on social media are misusing the pictures uploaded by women users and enraging their modesty,” she wrote in the letter. Chitra Wagh said these apps use the pictures uploaded by women users on their social media accounts and digitally remove their clothes, and then those pictures are made viral on the internet. She requested such apps should be banned to stop such indecent incidents.
News English Title: Ban those apps used for morphed women photographs demanded by BJP Leader Chitra Wagh News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल