14 January 2025 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

आधी प्रकरण कौटुंबिक असल्याचं म्हटलं | आता बीड भाजप करुणा शर्मांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार

Karuna Munde

परळी, ०७ सप्टेंबर | जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

आधी प्रकरण कौटुंबिक असल्याचं म्हटलं, आता बीड भाजप करुणा शर्मांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार – Beed BJP will protest for Karuna Sharma said Rajendra Mhaske :

करुणा शर्मा प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका, सत्तेचा दुरूपयोग, गाडीत शस्त्र कुणी ठेवले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजूबाजूला पोलिस दिसत आहेत. जिथे अन्याय तिथे भाजपा उभा राहणार करुणा शर्मा प्रकरण हे कौटुंबिक नसून आता ते सार्वजनिक झाले आहे. एखादी महिला शस्त्राने हल्ला कसा करेल करुणा शर्मा यांना यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन मदत मागितल्यास ती देखील करणार असल्याचे बीड राजेंद्र मस्के यांनी सांगितले.

याप्रकरणावर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे ट्वीटमध्ये काय म्हणाला?
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.. असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Beed BJP will protest for Karuna Sharma said Rajendra Mhaske.

हॅशटॅग्स

#KarunaSharma(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x