21 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर?

BHR Scam

जळगाव, १८ जून | जळगावसह राज्यात एकाच दिवशी धरपकड करीत कारवाई केल्याने बीएचआर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून ठेवीदारांशी दलाली करणारे देव पाण्यात टाकून बसले आहेत. एका आमदाराचे नाव दिवसभर जोडले जात असले तरी दुसरा आमदार थोडक्यात बचावला आहे. सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भुमिका घ्यावी लागणार असून मोठा मासा पुढील आठवड्यात पथकाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचआर) पतसंस्थेतील बहुचर्चित घाेटाळ्यात औरंगाबादच्या आदर्श उद्याेगसमूहाचे सर्वेसर्वा व सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ अंबादास मानकापे पाटील यांना गुरुवारी पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पुण्याच्या न्यायालयाने त्यांची पाच दिवस काेठडीत रवानगीही केली आहे. मानकापे पाटील यांचा प्रवास अचंबित करणारा आहे. सहकार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस लागलेल्या मानकापे पाटलांनी सेवानिवृत्तीनंतर तब्बल चौदा सहकारी, खासगी संस्था स्थापन केल्या. गेल्या २२ वर्षांत ते औरंगाबाद जिल्ह्यातील बडे प्रस्थ म्हणून उदयास आले. मात्र आता त्यांच्या अटकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

१३ मार्च १९६३ रोजी मानकापे पाटील सहकार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून विभागीय सहनिबंधक (सहकार) कार्यालयात रुजू झाले हाेते. पुढे पदोन्नतीने ते वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक, विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) झाले. सुमारे ३६ वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर ३० सप्टेंबर १९९९ रोजी विशेष वसुली अधिकारी (श्रेणी १) या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यात संस्थांच्या माध्यमातून नव्याने प्रवेश केला. ‘आदर्श’ नावाने सहकारी बँक, पतसंस्था, दूध डेअरी, रुग्णालये, महिला बँक, कॉटन जिनिंगच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीत ‘सहकाररत्न’ म्हणून ख्याती मिळवली. बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात जवळपास एक लाख महिला सदस्यांचे जाळे तयार केले.

शिवाय काही वर्षांपूर्वी एक वर्तमानपत्र सुरू करून त्यांनी त्याचे संपादकपदही मिळवले हाेते. या अनेक सहकारी संस्था, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार असे शहरात जवळपास १० हजार लोक त्यांनी जोडले. मोठे नेटवर्क तयार झाल्याने राजकीय वर्तुळातही त्यांची ऊठबस हाेती. नुकत्याच झालेल्या औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी प्रस्थापितांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र आता घाेटाळ्यात नाव आल्याने त्यांच्यावर काेठडीत जाण्याची वेळ आली.

ठेवीदारांना फसवून ७ काेटी कर्ज फेडल्याचा आराेप:
बीएचआर पतसंस्था अवसायनात निघाली हाेती. त्यामुळे अनेक ठेवीदारांना पैसे बुडण्याची भीती हाेती. त्याचा फायदा घेऊन काही बड्या लाेकांनी घाबरलेल्या ठेवीदारांशी एजंटांमार्फत संपर्क साधला. तुमचे अडकलेले पैसे काढून देताे, त्यापैकी २५ ते ३० टक्के रक्कमच तुम्हाला मिळेल. मात्र सर्व पैसे मिळाले असे लिहून द्यावे लागेल, असे सांगून काही संशयितांनी या पद्धतीने ठेवीदारांकडून एफडीच्या पावत्यांवर सह्याही घेतल्या हाेत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास मानकापे यांनी बीएचआर पतसंस्थेकडून १० काेटी कर्ज घेतले हाेते. त्यापैकी सात काेटी रुपयांचे कर्ज त्यांनी अशा प्रकारे ठेवींच्या पावत्या मिळवून फेडल्याचा संशय आहे. यात त्यांना पतसंस्थेशी संबंधित बड्या लाेकांची मदत झाली. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मानकापेंना अटक करण्यात आली. आता त्यांची सखाेल चाैकशी हाेईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: BHR scam Ambadas Mankape arrested by Pune economic crimes branch news updates.

हॅशटॅग्स

#BHRScam(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x