23 November 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

BHR घोटाळा | अडचणीत वाढताच गिरीश महाजन म्हणाले, सुनील झंवर सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय

BHR Scam

जळगाव, १४ ऑगस्ट | भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गिरीश महाजन यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सुनील झंवर सर्वांच्या निकट असल्याचे सांगितले

बीएचआर पतसंस्थेप्रकरणी अनेक दिग्गज अडचणीत आले असून बहुतांश जणांना अटक झाली आहे. बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयीत सुनील झंवर याला नुकतेच अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यात सुनील झंवर याचे नाव आल्यानंतर ते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचेही नाव जोडले जात होते. तेव्हा आ.महाजन यांना विचारणा केली असता झंवर सर्वांचेच निकटवर्तीय असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.

शुक्रवारी आ.महाजन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना पुन्हा सुनील झंवरबाबत विचारणा केली. आ.महाजन म्हणाले की, झंवर यांना अटक झाली असून तपास यंत्रणा पुढील तपास करीत आहे. त्यातून जे निष्पन्न व्हायचे ते होईल. सुनील झंवर सर्वांचे निकटवर्तीय असून प्रत्येकाचे त्याच्याशी संबंध आहे. सर्वच पक्षातील लोकांशी त्यांचे संबंध आहेत. कुणी नाही म्हणावे त्यांचे माझ्याशी संबंध नाही, असे आ.महाजन म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BHR Scam Sunil Zanwar have close relations with all politicians said BJP MLA Girish Mahajan news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x