15 November 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

पूजा चव्हाणला इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवकही | अजून चौकशी बाकी

BJP corporator Dhanraj Ghogare, Pooja Chavan case, Minister Sanjay Rathod

मुंबई, १७ फेब्रुवारी: परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.

संजय राठोड 3 फेब्रुवारीला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला हजर होते. मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून ते नॉट रिचेबल आहेत. मुंबईतील घरातही ते नसल्याची माहिती आहे. त्यातच संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चाही फेर धरत आहेत. परंतु सरकारकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. दरम्यान एकाबाजूला आक्रमक झालेलं भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दुसऱ्याबाजूला संजय राठोड यांच्या समर्थनार्थ राजीनामा देणारे भाजपचे पदाधिकारी समोर येतं आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची सखोल चौकशी झालेली नाही. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या साक्षीदारांपैकी एक जण भाजप नगरसेवक आहे. पण तेदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी, माहिती देण्यासाठी पुढे आलेले नाहीत.

पूजा चव्हाणनं आत्महत्या केली की भोवळ येऊन पडल्यानं तिचा मृत्यू झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पूजा इमारतीमधून पडल्यावर तिथे चार जण उपस्थित होते. अरुण राठोड, अनिल चव्हाण, भाजप नगरसेवक धनराज घोगरे आणि त्यांची पत्नी असे चौघेजण पूजाला घेऊन रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यामुळे हे चौघे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप तरी त्यांची सखोल चौकशी केलेली नाही.

 

News English Summary: The key witnesses in the Pooja Chavan death case have not been thoroughly questioned. They were then released. One of the important witnesses is a BJP corporator. But they also did not come forward to comment on the matter.

News English Title: BJP corporator Dhanraj Ghogare also a witness in Pooja Chavan case news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x