16 April 2025 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

BREAKING | रेणू शर्मा हनी ट्रॅपर | भाजपचे नेते कृष्णा हेगडेंचा आरोप | मलाही जाळ्यात ओढण्याचा...

BJP leader Krishna Hegde, Renu Sharma, Dhananjay Munde

मुंबई, १४ जानेवारी: बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत.

दरम्यान भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.

मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.

दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं. आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

 

News English Summary: BJP leader Krishna Hegde has leveled serious allegations against Renu Sharma. He has written a detailed letter to the Mumbai Police in this regard. In this letter, Krishna Hegde has sensationally accused Renu Sharma of trying to lure me into a relationship. Renu Sharma has been calling and texting me since 2010. She was constantly pushing me for a relationship.

News English Title: BJP leader Krishna Hegde made serious allegation on Renu Sharma news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या