BHR Society Scam | सुनील झंवर यांच्या कार्यालयात महाजनांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचं वृत्त
जळगाव, ३० नोव्हेंबर: केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.
कारण भारतीय जनता पक्षाचे सकंटमोचक अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर (Former Minister Girish Mahajan and Sunil Zanwar connections) या उद्योजकावर BHR सोसायटी प्रकरणात काल (Economic offences wing raids on BHR Society Scam Case) राज्य आर्थिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी केल्याचं वृत्त आहे. राज्यातील मोठे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला काहीदिवसच पूर्ण झालेले असताना महाजनांचे खंदे समर्थक आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आल्याने भारतीय जनता पक्षाचे देखील धाबे दणाणले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले गिरीश महाजन यांनाच अप्रत्यक्षरित्या कोंडीत पकडण्याची व्यूहरचना असल्याचं समजतं.
धक्कादायक म्हणजे BHR Credit Society’मधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील संशयित उद्योजक सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचे वृत्त आहे. तसेच याच कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांची ATM Card मिळाल्याची माहीती आहे. दरम्यान कागदपत्रे सापडली आहेत परंतु, ती कुणाशी संबधित आहे याचा तपास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे गुन्ह्याती संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या संदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.
News English Summary: The state was rocked after the Bharatiya Janata Party (BJP) at the Center raided the office of Shiv Sena MLA Pratap Saranaik, a major party in the Mahavikas Aghadi. It was later argued that the same would happen to other leaders in the Mahavikas Aghadi. But after that, Shiv Sena had also criticized the Bharatiya Janata Party. There were also indications from the state authorities that the Mahavikas Aghadi government would find out the connections of the BJP leaders and wash their hands of them. It has to be said that its suffix is beginning to come.
News English Title: BJP MLA Girish Mahajan in danger zone in BHR Society Scam Case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS