7 January 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

BHR Scam | सुनील झंवर'सोबत माझा कोणताही संबंध नाही | माझ्या कंपन्यांचा उद्योग २०० कोटींचा - भाजप आमदार

BHR Scam

मुंबई, १४ ऑगस्ट | भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था अर्थात बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य संशयित सुनील झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे अटक केली. सुनील झंवर हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानला जात असल्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील झडतीमध्ये महाजन यांच्या शस्त्र परवान्याच्या झेरॉक्स मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या गिरीश महाजन यांना याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सुनील झंवर सर्वांच्या निकट असल्याचे सांगितले

बीएचआर पतसंस्थेप्रकरणी अनेक दिग्गज अडचणीत आले असून बहुतांश जणांना अटक झाली आहे. बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयीत सुनील झंवर याला नुकतेच अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यात सुनील झंवर याचे नाव आल्यानंतर ते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचेही नाव जोडले जात होते. तेव्हा आ.महाजन यांना विचारणा केली असता झंवर सर्वांचेच निकटवर्तीय असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.

दुसरीकडे, सनसनाटी निर्माण करण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरण्यात आल्या. विशेष सरकारी वकील आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या बातम्या दिल्या. रिमांडमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. पतसंस्था खरेदी प्रकरणातील माझा आणि कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. मी उद्योजक म्हणून आहे. माझ्या कंपन्यांनाचा अधिकृत उद्योग २०० कोटींचा आहे. बीएचआरकडून घेतलेले कर्ज कोणतीही सेटलमेंट न करता भरलेले आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणेने तपास करावा. जर त्यात काही तथ्य असेल तर कारवाई करावी, असे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

आमदार चव्हाण म्हणाले की, राजकारणात काही लोक मदत करतात तर काही जण इतर भुमिका पार पाडतात. ज्या-ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बाजू मांडताना आवश्यक वाटते ते मी करतो. बीएचआरमध्ये तपास यंत्रणेने कोणतीही माहिती देताना नियमांचे पालन करावे. माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने माध्यमात बातम्या पेरण्यात आल्या. कुणी या बातम्या पसरवल्या हे मी समोर आणेल. कुणीतरी राजकीय कट कारस्थान रचून बहुजन समाजाच्या लोकप्रातिनिधिला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. आजारी अजून नॉट रीचेबल होणारा मी आमदार नाही. सांगतील तेव्हा मी हजर राहील. ज्यांनी माझी बदनामी केली असेल त्यांच्या विरोधात मी रीतसर कायदेशीर बाजूने तक्रार करणार आहे. ठेवीदारांना पैसे मिळविण्याचा प्रमुख उद्देश असताना ठराविक लोकांना अडकविण्याचा हा प्रयत्न आहे. अनेकांनी पावत्या मॅचिंग केल्या असताना ठराविक लोकांना अडकविण्याचे कटकारस्थान सरकारने आणि काही लोकांनी करू नये, असेही आ.चव्हाण म्हणाले. मी अनेक प्रकरणात पत्रव्यवहार केला आहे. आजवर ६ हजार पत्रे माझ्या कार्यालयातून गेली आहेत. माझ्या मतदारसंघातील काही नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा माझा कोणताही संबंध नाही. जर तसे असेल तर मी केव्हाही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे, असे आ.चव्हाण यांनी सांगितले.

मी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहिणार असून तपास यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना भेटणार आहे. सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. मी मागितलेली माहिती अद्याप अपूर्ण असून ती वेळ आल्यावर विधिमंडळात मांडणार आहे. सध्या असे पसरवले जाते आहे की, कर्जदारांनी पैसे भरल्यावर ते ठेवीदारांना मिळतील परंतु ते चुकीचे आहे. कर्जदारांनी सुरक्षेपोटी ती रक्कम न्यायालयात जमा केली आहे. अंतिम निकाल लागल्यावरच पुढील रक्कम ठेवीदारांना मिळणार आहे. सध्या ठेवीदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आ.चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Mangesh Chavan talked on BHR scam case news updates.

हॅशटॅग्स

#BHRScam(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x