22 December 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

मिठी नदीतील वस्तू NIA'ने प्लांट केल्याचा वाझेंच्या वकिलाचा दावा | भाजप नेत्याच्या दाव्याने शंका वाढली?

BJP MLA Sudhir Lad, material found, Mithi River, Sachin Vaze

मुंबई, ६ एप्रिल: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात शनिवारी सचिन वाझे आणि NIAच्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी न्यायालयात केलेली एकूण मांडणी पाहता सचिन वाझे यांनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या NIAच्या हवाल्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना मिठी नदीच्या परिसरात नेले होते. एनआयएच्या दाव्यानुसार, यावेळी सचिन वाझे यांच्या सांगण्यानुसार मिठी नदीतून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, संगणक आणि सीपीयू अशा गोष्टींचा समावेश होता.

मात्र, वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांनी या सगळ्याविषयी शंका उपस्थित केली. मिठी नदी ही 17.84 किलोमीटर इतकी लांब आहे. तिची खोली जवळपास 70 मीटर इतकी आहे. मग सचिन वाझे यांनी फेकलेल्या वस्तू इतक्या दिवसांनी त्याच जागेवर कशा काय सापडल्या, असा सवाल आबाद पोंडा यांनी विचारला. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे या वस्तू एनआयएनेच प्लांट केल्याचे सूचित केले आहे.

त्यानंतर मुंबईत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. त्यावेळी मिठी नदीत एनआयएला लॅपटॉप, डीवीआर सापडल्यानंतर प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मिठी नदी इतक्या दिवस साफ का होत नव्हती हे आता समजलं. मिठी नदीत वाझेंनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर सेनेचं पाप जनतेसमोर उघड करू असं त्यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले होते.

मात्र आता भाजपचे हेच आमदार याच विषयाला अनुसरून पुन्हा खात्रीलायक प्रतिक्रिया देत असल्याने सचिन वाझे यांच्या वकिलाने केलेला दावा आणि भाजप नेत्यांमधील ठामपणा त्यांच्याभोवतीच संशय कल्लोळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

आता मोठी नदीतील वस्तुंच्या आधारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजून टोकाचं वक्तव्य करत त्यासोबत खात्री दिल्याने त्यांच्यावर संशय बळावू शकतो. त्यांनी म्हटलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले. विशेष म्हणजे NIA याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करत नाही. मग ठराविक अधिकारी ती दिल्लीमार्फत राज्यातील नेत्यांकडे वर्ग करत आहेत का अशी शंका बळावते आहे. तर एनआयएला सापडलेल्या लॅपटॉप, डीवीआरमध्ये कोणत्या व्यक्तीचं नावं किंवा माहिती आहे हे भाजप आमदार प्रसाद लाड यांना कसं कळलं हे देखील शंका व्यक्त करणारं आहे.

 

News English Summary: The special court of the National Investigation Agency (NIA) on Saturday heard the arguments of Sachin Vaze and the NIA’s lawyers. Senior lawyer Abad Ponda is defending Sachin Vaze in court. Sachin Vaze has not yet made any confession before the NIA, given the overall structure he has set up in court. Doubts have now arisen as to how much truth there is in the claims made by the NIA that Sachin Vaze was fully checked.

News English Title: BJP MLA Sudhir Lad statement with confidence on material found in Mithi River to NIA news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x