22 January 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

अटक झालेला भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष बांगलादेशी | राष्ट्रवादीचं भाजपवर टीकास्त्र

BJP North Mumbai Minority Youth President Rubel Jonu Sheikh, Arrested, Anti terrorism squad

मुंबई, १७ फेब्रुवारी: मालवणी पोलीस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने मालाड मालवणीच्या आंबोजवाडी, आंबेडक चौक, गेट नं. 8 येथे धाड टाकून रुबेल जोनू शेख या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तो बांग्लादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे तो भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष आहे.

त्याच्याकडे पश्चिम बंगालच्या मलापोटा येथील उत्तर परगणा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला त्याच्याकडे आढळला. तसेच नादिया जिल्ह्यातील हंसाखाली येथील त्याचा जन्म दाखला आणि नादियातीलच आदर्श हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला देखील त्याच्याकडे आढळल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मात्र मलापोटा ग्रामपंचायतीने शेखला कोणताही रहिवासाचा दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलं. तर त्याने ज्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे, ती शाळाच अस्तित्वात नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. त्याचे सर्व कागदपत्रे बनावट आढळल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात कलम 465, 467, 471, 34 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मालवणीच्या आंबोजवाडी परिसरात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी शेख याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा बांग्लादेशी नागरिक आहे. त्याने भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच भारतात भारत सरकारने विहित केलेल्या मार्गाव्यतिरिक्त भारत व बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवास केला. तसेच वास्तव्यही केले म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करून पुन्हा त्याची रवानगी बांग्लादेश येथे करण्यात येणार आहे. शेख हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती असून यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. एककीडे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. पण आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच बांग्लादेशी असल्याचं उघड झालं आहे. बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भारतीय जनता पक्षाने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे, याकडे महेश तपासे यांनी गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

तसेच बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष घेणार का असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे.

 

News English Summary: The anti-terrorism squad of Malvani police station raided Ambojwadi, Ambedkar Chowk, gate no. 8 Rubel Jonu Sheikh, a 24-year-old youth, was arrested in a raid here. It was revealed that he was a resident of Bowalia village in Jasur district of Bangladesh. He entered India in 2011 without any documents and started living in Malad, police sources said. He is the North Mumbai Minority Youth President of the Bharatiya Janata Party.

News English Title: BJP North Mumbai Minority Youth President Rubel Jonu Sheikh arrested by anti terrorism squad of Malvani police station news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x