6 November 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

भाजप आ. मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या मुलाविरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा

BJP Mla Mangalprabhat Lodha, extortion and fraud

मुंबई, 13 मार्च: भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात कोर्टाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP president and MLA Mangalprabhat Lodha along with his son were booked at the Chaturangi police station on Friday on a charge of extortion and fraud)

मला धमकावून खंडणी मागितली,’ असा फौजदारी दावा महिलेने शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी दाव्याद्वारे केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

या प्रकरणी एका ५३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वकील असून त्या चतु:शृंगी भागात राहायला आहेत. तक्रारदार महिलेला मुंबईत सदनिका घ्यायची होती. त्यांनी परिचितामार्फत शहानिशा करून मुंबईतील वरळी भागात असलेल्या लोढा पार्कमध्ये असलेल्या ‘मार्किंग्ज’ या गृहप्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचे निश्चित केले होते. लोढा यांचे कार्यालय मुंबईतील महालक्ष्मी भागात अपोलो मिल कंपाऊंडमध्ये आहे.

तक्रारदार महिलेला विक्री करण्यात येणाऱ्या सदर गृहप्रकल्पातील सदनिकेचे मूल्य पाच कोटी ५९ लाख २७ हजार रुपये ठरविण्यात आले होते. २०१३ नंतर तक्रारदार महिलेने लोढा यांना वेळोवेळी तीन कोटी ९२ लाख रुपये दिले. परंतु, मागील ९ वर्षात महिलेला सदनिकेचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे महिलेने सदनिका खरेदी व्यवहार रद्द करण्याचे ठरवले. त्यानंतर तक्रारदार महिलेला लोढा आणि नायर यांनी धमकावण्यास सुरुवात केली.

त्यानंतर वाढीव ४ कोटी १५ लाख १५ हजार एवढी रक्कम भरा, अन्यथा सदनिका खरेदी करार रद्द करण्यात येईल तसेच यापूर्वी भरण्यात आलेली रक्कम देखील जप्त करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

 

News English Summary: BJP president and MLA Mangalprabhat Lodha along with his son were booked at the Chaturangi police station on Friday on a charge of extortion and fraud. In this case, Jwala Real Estate Pvt. Ltd. A case has been registered against Mangalprabhat Lodha, owner of Microtech Developers, his son Abhishek and Surendran Nair under the sections of ransom, fraud and intimidation.

News English Title: BJP MLA Mangalprabhat Lodha along with his son were booked on a charge of extortion and fraud news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x