14 January 2025 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील | ते प्रसारमाध्यमांचा चेहरामोहरा बदलतील

BJP Spokesperson Sambit Patra, Arnab Goswami, Mahatma Gandhi, Nelson Mandela

मुंबई, १० नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) हे तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळतील असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP National Spokeperson Sambit Patra) यांनी व्यक्त केला आहे. रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान पात्रा यांनी अर्बण यांची तुलना थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला (Mahatma Gandhi and Nelson Mandela) यांच्यासोबत केली.

अर्णब यांना देखील या दोघांप्रमाणे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून भविष्यात आपल्याला अर्णब गोस्वामी अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब हे भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि ते प्रसारमाध्यमांचे चेहरामोहरा बदलून टाकतील असं मत देखील संबित पात्रा यांनी व्यक्त केलं.

अर्णब गोस्वामी यांना नक्कीच न्याय मिळेल असा ठाम विश्वास पात्रा यांनी व्यक्त केला. “अर्णब गोस्वामी यांना न्याय नक्कीच मिळेल. सगळ्याच गोष्टी टीव्हीवर सांगता येत नाहीत. भारतीय संविधानावर आपण विश्वास ठेवा. मी भारतीय जनता पार्टीवर किंवा सरकारवर विश्वास ठेवा असं देखील मी म्हणणार नाही कारण या दोन्ही गोष्टी देखील संविधानानुसारच काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्णबला कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नाही,” असं संबित पात्रा म्हणाले.

 

News English Summary: BJP National Spokesperson Sambit Patra has expressed confidence that Republic TV Editor Arnab Goswami will be seen in a completely different light after his release from jail. During a discussion on Republic TV, Patra compared Urban directly to Mahatma Gandhi and the late former South African leader Mahatma Gandhi and Nelson Mandela.

News English Title: BJP Spokesperson Sambit Patra compares Arnab Goswami with Mahatma Gandhi And Nelson Mandela News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x