15 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

अनिल देशमुख यांना सीबीआय'कडून समन्स | बुधवारी चौकशी होणार

CBI, Anil Deshmukh

मुंबई, १२ एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज(सोमवार) सीबीआयकडून बजावण्यात आलं आहे. यानुसार आता अनिल देशमुख यांची बुधवार १४ एप्रिल रोजी चौकशी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

सीबीआयच्या तपास पथकाकडून रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व साहाय्यक एस. कुंदन यांची कसून चौकशी केली होती. सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या एसीपी संजय पाटील यांची सीबीआयकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे.

 

News English Summary: CBI has summoned former Maharashtra Home Minister Anil Deshmukh on 14th April, in connection with alleged corruption casesaid CBI official.

News English Title: CBI has summoned former Maharashtra Home Minister Anil Deshmukh for enquiry news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x