22 November 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

फेसबुक डाटा चोरी प्रकरण | केम्ब्रिज अॅनालिटिका विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

CBI lodges case, Cambridge Analytica, Facebook data theft

नवी दिल्ली, २२ जानेवारी: देशात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वतःकडे घेतलाय. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून युनायटेड किंगडमच्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक युझर्सचा डाटा चोरी करण्याच्या आरोपासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फेसबुक-कँब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वीच संसदेत दिली होती.

मार्च 2018 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे पाच कोटीपेक्षा जास्त युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय फेसबुक प्रोफाइलवरुन चोरल्याचं वृत्त दिलं होतं. याउलट फेसबुकने भारत सरकारला 5 एप्रिल, 2018 रोजी सांगितलं होतं की, कँब्रिज अ‍ॅनालिटिकाने इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपद्वारे जवळपास 5,62,455 भारतीयांचा फेसबुक डेटा हस्तगत केला.

 

News English Summary: The Central Bureau of Investigation (CBI) is now investigating the Facebook data theft case that has caused a stir in the country. A case has been registered against Cambridge Analytica, a United Kingdom company, by the Central Bureau of Investigation (CBI). The case has been registered against 5.62 lakh Indians for stealing data of Facebook users.

News English Title: CBI lodges case against Cambridge Analytica for Facebook data theft news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x