14 January 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

इतर पत्रकारांना चाय-बिस्कीट खाणारे हिणवलं | आज मालकावर चाय-बिस्कीट खाण्याची वेळ

Chai Biscuit, Arnab Goswami, Taloja jail

रायगड, ८ नोव्हेंबर: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.

त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून आता तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी रायगड आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त टीमने त्यांच्या राहत्या घरातून सकाळी अटक केली होती. तिथून त्यांना थेट अलिबाग येथे नेण्यात आले होते. तिथे कोर्टात हजर केले असतान त्यांना १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अर्णब गोस्वामी यांना कोरोना अडचणीच्या अनुषंगाने अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते.

आज अर्णब गोस्वामीला कोणतीही बँड्रेड गोष्ट खाण्यापिण्यासाठी मिळत नसून त्याने मागील काही दिवस अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात चाय बिस्कीट खाणेच पसंत केल्याचे वृत्त आहे. मात्र त्यानंतर समाज माध्यमांवर जुन्या गोष्टींना म्हणजे “कर्म” नावाने अनेक पोस्ट व्हायरल होतं आहेत. कंगना रानौत आणि सुशांत प्रकरणी रिपोर्टींग करताना रिपब्लिकच्या रिपोर्टर्सने चुकीच्या प्रकारे रिपोर्टींग करताना इतर पत्रकारांना हिणवत हे चाय बिस्कीट खाणारे पत्रकार असं म्हटल्यावर त्यांना इतर पत्रकारांनी चोप दिला होता.

विशेष म्हणजे त्यानंतर इतर उपस्थित पत्रकारांनी एकत्र जमून चाय-बिस्किटाचा आस्वाद घेतला आणि होता रिपब्लीकची फिरकी घेतली होती. मात्र आज नियतीने त्यांच्या म्हणजे रिपब्लिकच्या मालकावरच चाय बिस्कीट खाण्याची वेळ आणली आहे.

 

News English Summary: It is reported that Arnab Goswami does not get anything to eat or drink and he prefers to eat tea biscuits at the Marathi school in Alibag for the last few days. But since then, many posts have gone viral on social media under the name of Karma. While reporting on the case of Kangana Ranaut and Sushant, they were slapped by other reporters for allegedly misbehaving while reprimanding other journalists for eating tea biscuits.

News English Title: Chai Biscuit is trending on social media after Arnab Goswami shifted to Taloja jail news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x