18 November 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Pegasus हॅकिंग प्रकरण | तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे - राहुल गांधी

Pegasus hacking

नवी दिल्ली, १९ जुलै | संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.

या अधिवेशनाआधी लोकसभेच्या ४४४ आणि राज्यसभेच्या २१८ सदस्यांसह २०० वर कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली. शिवाय अधिवेशनादरम्यानही कोरोना प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन केले जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर होत असलेल्या या अधिवेशनात नवीन मंत्र्यांची पहिली परीक्षा होईल. त्यात शिक्षणाच्या मुद्द्यावर धर्मेंद्र प्रधान, आरोग्यावर मनसुख मांडविया, पेट्रोलियमच्या किमतीवरून हरदीपसिंग पुरी यांना विरोधकांचा सामना करावा लागेल. सोशल मीडियाबाबतच्या मुद्द्यांवर अनुराग ठाकूर यांना नवीन मंत्रालय सांभाळताच अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी करावी लागेल.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Rahul Gandhi took a jibe at the government over the Pegasus hacking controversy news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x