23 February 2025 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण होताच आंदोलनं | पोलिसांना मारहाण होताच आरोपींना सोडा

Congress leader Sachin Sawant, Ram Kadam, Assaulted a policeman

मुंबई, १२ जानेवारी: राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याच आरोपी कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांचा पोलिसांना कॉल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न.

तत्पूर्वी मुंबईत काही महिन्यांपूर्वी पक्ष प्रमुखांवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी माजी नौदल सैनिकांवर हल्ला केला होता. त्या घटनेनंतर भाजपने मुंबईत एक प्रमकारे अभियानच राबवलं होतं. त्यात आमदार राम कदम, अतुल भातखळकर आघाडीवर होते. मात्र मुंबई पोलिसांवर हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते पकडले गेल्यावर हेच भाजप आमदार जणू काही घडलंच नाही असे समाज माध्यमांवर शांत आहेत.

त्यालाच अनुसरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, “माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांना अटक झाली होती तरी त्याविरोधात आंदोलनाचा तमाशा अतुल भातखळकर यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी केला. राज्यपालांना भेटले. आता एका पोलीसाला मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना राम कदम सोडा म्हणतात. हा दांभिकपणा, दुतोंडीपणा भाजपाच करु शकते.

 

News English Summary: In a tweet, Sachin Sawant said, “Even though the assailants of a former naval officer were arrested, several BJP leaders, including Atul Bhatkhalkar, staged a protest against him. They met the governor. Now the BJP workers who assaulted a policeman and Ram Kadam said release them. Only the BJP can do that.

News English Title: Congress leader Sachin Sawant criticised BJP leaders over assaulted a policeman news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x