23 February 2025 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

CDR चा स्त्रोत आणि CDR स्वतः कडे ठेवून फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत - काँग्रेस

Congress, Sachin Sawant, Devendra Fadnavis, CDR

मुंबई, १७ मार्च: राज्य संकल्पिय अधिवेशनात फडणवीसांनी स्वतःलाच गोत्यात आणलं आहे असंच म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी देखील याची आठवण त्यांना विधिमंडळातच करून दिली होती. मात्र, त्यानंतर देखील ते माझ्यावर कारवाई करा असं तावातावाणे बोलून गेले खरे, मात्र आता राजकीय अडचणीत सापडले आहेत. काँग्रेसने ते थेट न्यायालयाचा दाखल देत फडणवीसांना सल्ला दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर दाखवत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा हवाला देत वाझे यांनी हिरेन यांची हत्या केली असल्याचंही फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांनी मिळवलेल्या सीडीआरवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

कर्नाटक हायकोर्टाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत‌. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: The Karnataka High Court’s March 15 decision will hold the officer responsible for providing private information about the accused to a third party. Without stating the source of the CDR received by Devendra Fadnavis and keeping the CDR to himself, he is backing the two accused. Sachin Sawant has said that he should not be involved in the crime.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant advice to Devendra Fadnavis over CDR record news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x