14 January 2025 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

जमिनीवरील तपासापासून ते खाडीच्या पाण्याखाली काय घडलं | फडणवीसांकडून खुलासा | काँग्रेसचा हा सल्ला

Sachin Sawant, Devendra Fadnavis, Sachin Vaze, NIA

मुंबई, १७ मार्च: महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना सेवेत परत का घेण्यात आलं, असा सवाल महाराष्ट्र सरकारला केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की, जी घटना मुंबईत घडली. उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर ज्याप्रकारे जिलेटीन कांड्याने भरलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली व त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. त्यानंतरच्या घटनांमधील सर्वात मोठी कडी मनसुख हिरेन यांचा ज्या प्रकारे खून केला जातो. या सर्व गोष्टी मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासात या अगोदर कधीच घडल्या नाहीत. आम्ही ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचा महराष्ट्रात अनुभव घेतला होता. तशाचप्रकारची परिस्थिती आणि आता तर संरक्षण करणारेच अशाप्रकारे गुन्हे करत असतील, तर मग संरक्षण कोण करणार हा प्रश्न आहे.

परमबीर सिंग व सचिन वाझे तर खूपच लहान नावं आहेत. यामागे कोण बड्या हस्ती आहेत, त्यांची नावं समोर यायला हवीत. सचिन वाझेंना वापरणारी माणसं सरकारमध्ये बसलेले आहेत, त्यांची चौकशी कोण करणार?” असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडून झालेला नाही. त्यांच्या फुफ्फुसात पाणी आढळून आलेलं नाही. त्यांच्या तोंडाजवळ रुमाल आढळून आले. श्वास कोंडला गेल्यानं मनसुख यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्यात आला. मात्र मृतदेह पाण्यात टाकणाऱ्यांचा अंदाज अर्ध्या तासानं चुकला. त्यांनी भरतीऐवजी ओहोटी असताना मृतदेह टाकून दिला. तो वाळूत रुतून बसला, असं फडणवीस यांनी सांगितलं.

जमिनीवरील तपासापासून ते खाडीच्या पाण्याखाली काय घडलं यांचा संपूर्ण खुलासा फडणवीसांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने फडणवीसांना एक खोचक सल्ला दिला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, ‘फडणवीसांनी स्वतःची तपास यंत्रणा काढावी, त्यांची NIA’ च्या प्रमुखपदी नियुक्ती व्हावी. कारण असं दिसतंय की त्यांना तपास यंत्रणापेक्षा अधिक माहिती आहे.

 

News English Summary: Devendra Fadnavis should start his own investigation agency or he should be appointed as Head of NIA. He seems to know more than the Investigation agencies said congress spokesperson Sachin Sawant.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant slams Devendra Fadnavis after his press conference at Delhi on Sachin Vaze case news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x