5 November 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

कंगनाच्या अडचणी वाढल्या | न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे निर्देश

Court orders inquiry, Kangana Ranaut, Rangoli Chandel, Social Media

मुंबई, ३० ऑक्टोबर: विशिष्ट समुदाय व धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केली आणि त्या समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, या आरोपांप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल (Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel) यांची चौकशी करण्याचे अंधेरी न्यायदंडधिकारी न्यायालयाने (Magistrate court in Mumbai’s Andheri) गुरुवारी निर्देश दिल्याने या दोघींच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.

‘दोन्ही आरोपींविरोधातील पुरावे हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील असल्याचे दिसत आहे (posting provocative social media posts against a community). त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपींची भूमिका निश्चित करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाहीविषयी निर्णय घेण्यासाठी ही चौकशी सहाय्यभूत ठरेल’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम २०२ अन्वये ५ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.

अॅड. अली काशिफ खान देशमुख (advocate Ali Kaashif Khan Deshmukh) यांनी कंगना व रंगोलीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. ‘१५ एप्रिल रोजी रंगोलीने विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला होता. त्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट ट्विटरने काही काळासाठी बंद केले. मात्र, नंतर कंगनाने रंगोलीच्या विधानांचे समर्थन केले. त्यानंतर १८ एप्रिलला कंगनाने एक व्हिडीओ तयार करून विशिष्ट समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याने मी अंधेरीमधील अंबोली पोलिसांत तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही’, असे अली यांनी आपल्या तक्रारी म्हटले.

 

News English Summary: The magistrate court in Mumbai’s Andheri on Thursday ordered an inquiry against Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel for allegedly posting provocative social media posts against a community. The order for the inquiry was passed on the basis of a complaint filed by advocate Ali Kaashif Khan Deshmukh. The advocate had asked the court to take cognizance of the matter and initiated an inquiry against actor Kangana Ranaut and her sister Rangoli.

News English Title: Court orders inquiry against Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x