14 November 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

परमबीर सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस | 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

Parambir Singh

नवी दिल्ली, १० सप्टेंबर | सीबीआयची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी लाच दिल्याचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना यांच्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

परमबीर सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस, 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश – Delhi high court issued notice to CBI on bail plea of Anil Deshmukh lawyer :

दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी राऊस अव्हेन्यू कोर्टाने आनंद डागा आणि सीबीआयचे एएसआय अभिषेक तिवारी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अभिषेक तिवारीने तपासाची माहिती देण्यासाठी आनंद डागाकडून आयफोन 12 प्रो आणि इतर महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली होती.

अभिषेक तिवारी तपासासंदर्भात पुण्यात गेले होते, जिथे त्यांना लाच म्हणून महागड्या भेटवस्तू दिल्या गेल्या. कागदपत्रे लीक करण्याच्या बदल्यात तिवारी यांनी अनेक वेळा डागाकडून भेटवस्तू घेतल्या. अभिषेक तिवारीकडे संवेदनशील कागदपत्रे होती. तिवारी यांनी व्हॉट्सअॅपद्वारे डागासोबत अनेक संवेदनशील कागदपत्रे शेअर केली होती. त्यानंतर वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला, असेही सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Delhi high court issued notice to CBI on bail plea of Anil Deshmukh lawyer.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x