22 January 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण | उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य

Deputy CM Ajit Pawar, Pooja Chavan suicide case

पुणे, १२ फेब्रुवारी: पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पुजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे.

मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असंही म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून अनेक मुद्यांवर भाष्य केलंय.

 

News English Summary: Ajit Pawar has attacked BJP saying that let there be an inquiry into Pooja Chavan’s suicide, what will come out after the inquiry. He was speaking at a press conference held by Ajit Pawar. State Deputy Chief Minister Ajit Pawar has commented on many issues from the press conference.

News English Title: Deputy CM Ajit Pawar talked on Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x