14 January 2025 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

सचिन वाझेंनी अनेक पुरावे नष्ट केल्याने NIA'च्या अडचणीत वाढ

NIA, Sachin Vaze, Parambir Singh

मुंबई, १९ मार्च: मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून सचिन अटक करण्यात आली आहे. सध्या NIA कडून सचिन वाझेंची झाडाझडती घेतली जात आहे. NIA ने आतापर्यंत महागड्या अशा 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 96 लाखांची ट्राडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज कारचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पाच गाड्यांपैकी एक गाडी ही नवी मुंबईची नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीची चिठ्ठी ठेवलेली गाडी बेवारस सोडताना परिधान केलेले कपडे आरोपी सचिन वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळून नष्ट केले, असा दावा गुरुवारी ‘एनआयए’ने केला. सचिन वाझे यांनी वापरलेल्या आणखी दोन महागड्या गाड्याही या पथकाने जप्त केल्या.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीच्या रात्री बेवारस सापडलेल्या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही होती. या गाडीतून एक व्यक्ती उतरली, स्कॉर्पिओची पाहणी करून ती निघून गेल्याचे परिसरातील सीसीटीव्ही चित्रणावरून स्पष्ट झाले. ही व्यक्ती म्हणजे वाझेच होते, असा दावा ‘एनआयए’ने केला. त्या वेळी परिधान केलेले कपडे सचिन वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळले. पुरावा सापडू नये, या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले, असा दावा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने केला.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.

 

News English Summary: Sachin Vaze has been arrested by the National Investigation Agency (NIA) in connection with an explosive device found outside Mukesh Ambani’s house. Sachin Vaze is currently being picked up by the NIA. The NIA has so far seized 5 such expensive vehicles. This includes 96 lakh Trudeau, 2 Mercedes cars worth 55-55 lakh. It is noteworthy that one of these five trains is registered in Navi Mumbai.

News English Title: Destroying evidences made NIA investigation difficult in Sachin Vaze case news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x