22 December 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

परमबीर सिंग खोटं बोलत आहेत की सचिन वाझे? | दोघांच्या पत्रांतील आरोपात विसंगती

Sachin Waze, Parambir Singh, Letter Bomb

मुंबई, ९ एप्रिल: मागील काही दिवसांपासून सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात एखादी कारवाई किंवा लेटर बॉम्ब प्रसिद्धीस येण्यापूर्वीच भाजपचे नेते त्याबाबत अचूक भविष्यवाण्या करत असल्याने त्यांच्यावरच संशयाची राजकीय शंका बळावते आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते बोलतात त्यानंतर NIA कडून काही माहिती बाहेर येते याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण होतेय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राज्यात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी व गोष्टीमागे सरकार कधी जाईल याची वाट पाहणार्‍या लोकांची शक्ती आहे का? अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली. भाजपच्या नेत्यांनी २ दिवस थांबा… अजून एक विकेट पडणार आहे अशा आशयाचे भाष्य करणे आणि नंतर NIA मध्ये असलेलं पत्र प्रसारमाध्यमांना प्राप्त होणं आणि त्यात एक- दोन नाव समाविष्ट होणं हा काय प्रकार आहे असा सवाल देखील जयंत पाटील यांनी केला आहे.

आता जे पत्र बाहेर आलं आहे. त्यावर मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इतर नाव घेतली असेल तर त्यात तथ्य आहे की नाही हे पत्र वाचल्यावरच कळतं. त्यामुळे यामागे भाजपचं राजकारण आहे हे राज्यसरकारच्या लक्षात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

दुसरीकडे, सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या आरोपातील विसंगती चर्चेचा नवीन विषय बनला आहे. दोघांनीही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असले तरी त्यामध्ये मोठी विसंगती आहे. त्यामुळे कोणाचे आरोप खरे आणि कोण खोटे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नेमकं परमबीर सिंग खरे बोलत आहेत, की सचिन वाझे हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या तपासानंतरच समाेर येणार आहे. पण त्यांच्यासमोरील देखील गुंता आणि प्रश्नचिन्ह वाढण्याची शक्यता आहे.

नेमकी काय आहे विसंगती;

  1. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला फेब्रुवारीच्या मध्यावर बोलावून महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे वाझेच्या पत्रामध्ये या रकमेबद्दल कोणताही उल्लेख नाही.
  2. प्रत्येक बारमधून सरासरी तीन ते साडेतीन लाख वसूल करावे, असे म्हटले आहे शिवाय जानेवारीत गृहमंत्र्यांना भेटल्याचे नमूद केले आहे. वाझेने गेल्यावर्षी जुलै/ऑगस्टमध्ये अनिल देशमुख यांनी दाेन कोटींची मागणी केली होती, असे म्हटले आहे, तर परमबीर सिंग यांच्या पत्रात मात्र त्याचा उल्लेख नाही.
  3. सचिन वाझेने अनिल परब यांनी ‘सैफी’च्या ट्रस्टीकडून ५० कोटी, तर ५० ठेकेदारांकडून प्रत्येकी दोन कोटी वसूल करण्यास सांगितल्याचे पत्रात लिहिले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात असा कुठलाच उल्लेख नाही.
  4. परमबीर सिंग यांनी वाझेच्या गृहमंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीवेळी त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि अन्य एक, दोन स्टाफ असल्याचे म्हटले आहे तर सचिन वाझेच्या पत्रात पलांडेचा उल्लेख नाही. बारमधून वसुलीचा विषय काढण्यात आला, त्यावेळी देशमुख यांचे पीए कुंदन हजर असल्याचे लिहिले आहे.

 

News English Summary: The discrepancy between the allegations of Sachin Waze and Parambir Singh has become a new topic of discussion. Although both have made serious allegations of corruption against the ministers, there is a big discrepancy. Therefore, the question arises as to whose allegations are true and who are false. Parambir Singh is telling the truth that Sachin Waze will be arrested only after the investigation of the Central Investigation Agency. But there is also the possibility of growing entanglement and question marks in front of them.

News English Title: Discrepancy between the allegations of Sachin Waze and Parambir Singh has become a new topic of discussion news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x