23 February 2025 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

त्याने मीडियाची खिल्ली उडवली, माध्यमांचा गैरवापर केला | रजत शर्मा कोणावर संतापले?

Rajat Sharma, Arnab Goswami

मुंबई, १० नोव्हेंबर: रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई न्यायालयानं दिलेल्या अंतरिम जामीनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान दिलं आहे.

वास्तुसजावटकार अन्वय नाईक (Anvay Naik Suicide Case) यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Republic TV Editor Arnab Goswami) यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमच्या विशेष अधिकारात अर्णब यांना तातडीचा अंतरिम जामीन मंजूर करण्यासारखे हे प्रकरण नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

तत्पूर्वी, मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली होती. २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप अर्णव यांच्यावर आहे. नुकतंच त्यांना तळोजा तुरुंगात स्थलांतरीत करण्यात आलं. पोलिसांच्या गाडीतून जाताना अर्णव यांनी रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांनी गाडीच्या आतूनच सांगितले की, त्यांना मारहाण करण्यात आली असून त्यांच्या जीवाला धोका आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने लक्ष घालावं असा कांगावा केला होता.

मात्र इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक रजत शर्मा (India TV Editor in Chief Rajant Sharma) यांनी एक ट्विट केल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे. एका ट्विट मध्ये संताप व्यक्त करताना त्यांनी म्हटलं आहे की, “त्याने मीडियाची खिल्ली उडविली आणि माध्यमांचा गैरवापर केला, कॅमेर्‍यावर खोटे बोलले, त्याला मूलभूत शालीनता देखील नव्हती, खोटी लोकप्रियता मिळाली, आता सर्वोच्च न्यायालयाने आणि मीडियाने त्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा आहे! काय गुंडगिरी आहे … !!! मान्य करा आणि आता जा, श्री ट्रम्प….. असं म्हणत शेवटी ट्रम्प यांचं नाव घेतलं आहे. मात्र त्यांनी ट्रम्प नीतीचा अप्रत्यक्ष उल्लेख अर्णब गोस्वामीला फटकारलं असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

 

News English Summary: He ridiculed and abused media, lied on camera, had no basic decency, was mean to everyone, faked popularity, now he wants Supreme Court to rescue him and media to support him! What a bully…!!!Concede and go now, Mr Trump said Rajat Sharma.

News English Title: Does Rajat Sharma slams Arnab Goswami News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x