3 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Drugs Case NCB Witness Kiran Goswami | NCB साक्षीदार | फेसबूकवरुन ओळख करून तरुणांची आर्थिक फसवणूक

Drugs Case NCB Witness Kiran Goswami

मुंबई, १८ ऑक्टोबर | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी ऑफीसमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढणारा किरण गोसावी हा चर्चेत आला आहे. एनसीबीने किरण गोसावी हा आपला साक्षीदार असल्याचं सांगितलं. परंतू यानंतर किरण गोसावीने तरुणांना परदेशात नोकरी देतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर (Drugs Case NCB Witness Kiran Goswami) आलं. यापैकी पालघरच्या एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडल्याप्रकरणी किरण गोसावीविरुद्ध केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे पोलीस आरोपी किरण गोसावीच्या मागावर असून त्याला कधीही अटक करण्यात येऊ शकते असे कळते.

Drugs Case NCB Witness Kiran Goswami. Kiran Gosavi was operating a fraudulent racket from his Navi Mumbai office. Gosavi promised Utkarsh and Adarsh to work in Malaysia after they became friends on Facebook. Both of them then sent money to Gosavi’s bank account :

नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Drugs Case NCB Witness Kiran Goswami fraud wanted criminal says report.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x