28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी

Krishnur grain scam

नांदेड, ०८ जुलै | फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.

नांदेडमध्ये उघड झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास आता ईडी करतेय. कृष्णुर इथे उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्यातील आरोपी अजय बाहेती यांना ईडीने अटक केलीय. त्यानंतर आता नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात खळबळ उडालीय. याच घोटाळ्यातील आरोपी असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर तर पुन्हा गायब झाले आहेत. सध्या परभणी इथे कार्यरत असलेल्या वेणीकर यांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हजर होण्याची नोटीस बजावलीय. विशेष म्हणजे ईडीच्या भीतीमुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तपास अधिकारी म्हणून आयपीएस असलेले नरुल हसन यांची नियुक्ती केली होती. पोलिसांनी कारवाईची माहिती आम्हाला दिली नसल्याचा कांगावा महसूलचे अधिकारी करतायत. आपलं काही पितळ उघड पडेल या भीतीने महसूलचे अधिकारी माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. मात्र पोलिसांनी याच धान्य घोटाळ्याच्या संदर्भातला तेरा पानाचा अहवाल महसुल आयुक्ताकडे सादर केला होता.

मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या धान्य घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन बिंग फोडण्याचे धाडस आजतागायत कुणीही दाखवलं नव्हतं, परंतु, आता या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या अधिका-याकडे दिल्याने पोलीस या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचले होते.

सीआयडी नंतर आता थेट ईडी:
नांदेडच्या या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सीआयडीकडे हा तपास देण्यात आला. मात्र या घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर हा उजागरपणे फिरत असताना त्याला सीआयडी अटक करू शकली नाही. त्यातच या घोटाळ्यातील बहुतांश आरोपींचा जामीन झाला होता आणि या मंडळींनी पुन्हा आपला हाच धंदा सुरू ही केला होता. मात्र अचानकपणे गत आठवड्यात ईडीने या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अजय बाहेती ला अटक केलीय. दुसरीकडे गायब असलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांना हजर होण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी नोटीस बजावलीय. तर या धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने ईडी आता या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील अनेक जण भूमिगत झाले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED enter in Krishnur grain scam Parbhani Collector notice to absconding DY Collector Santosh Venikar news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x