18 January 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

प्रवीण राऊत यांच्या कंपन्यांमध्ये वर्षा राऊत भागीदार? | ईडीला संशय | त्यामुळेच...

ED, Varsha Raut, Praveen Raut, Sanjay Raut

मुंबई, ०३ जानेवारी: प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळतेय. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेनं आता ED विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली. विशेष म्हणजे अटकेत असलेले प्रवीण राऊत यांच्या एकूण ४ कंपन्यांमध्ये वर्षा राऊत यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे.

मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू आहे. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून घेतली.

दरम्यानच्या प्रवीण राऊत आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या त्यांच्या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्याच्याशी संलग्न रॉयटर्स एंटरटेन्मेंट, एलएलपी आणि सनातन मोटर्स या अन्य तीन कंपन्यांमध्ये वर्षा यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

News English Summary: Praveen Raut, who is facing money laundering charges, had deposited Rs 50 lakh in his account at PMC Bank 12 years ago. The ED has been asking him about this for the last one and a half months. He was summoned on December 29 to appear for questioning. However, he extended the deadline till January 5. Meanwhile, ED suspects that Praveen Raut and his wife Madhuri have a stake in his Avni Construction and three other companies affiliated with it, Reuters Entertainment, LLP and Sanatan Motors. Sources said that they will be asked about it.

News English Title: ED want to know if Varsha Raut also a partner in Praveen Raut companies news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x