9 January 2025 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | घाई करा, ऑफर संपण्यास केवळ 3 दिवस बाकी, ऑफरबद्दल पटापट जाणून घ्या, 500GB डेटा वापरता येणार IPO GMP | आला रे आला IPO आला, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO Watch Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

ईडीने काल DCP डॉ. राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला | आज अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी | काय कारण?

DCP Raju Bhujbal

नागपूर, २५ जून | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सिंग यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या व्हाट्सअॅप चॅटचा पुरावाही दिला होता. त्यानंतर देशमुख यांना त्यांचं गृहमंत्रीपदही सोडावं लागलं. मात्र, प्रत्यक्षात देशमुख यांनी वाझेंना वसुलीचे आदेश दिले नसल्याची माहिती उघड झाली होती.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलिसांना दिलेला कबुली जबाब प्रसार माध्यमांच्या हाती लागला होता. या चॅटनुसार पत्रात उल्लेख असलेल्या संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत आढळून आली होती.

देशमुखांनी मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये जमा करण्यास वाझेला सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख होता. पण पण प्रत्यक्ष जबाबात देशमुख यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख नसल्याचं दिसून आलं होतं. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी 3 लाख रुपये वसूल केले जात असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. ती खरी आहे का? मुंबईत असा काही प्रकार सुरू आहे का? अशी विचारणा देशमुख यांनी वाझेंना केली होती. तशी माहिती वाझेंनी मला दिली होती, असं पाटील यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ देशमुख यांनी वाझेंना पैसे जमा करण्यास किंवा वसूल करण्यास सांगितलं नव्हतं, असं स्पष्ट झालं होत. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याच्या जबाबामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांचा जबाब आज नोंदवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जबाबामुळे अनिल देशमुख यांनाच काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता अधिक आहे असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Enforcement Directorate recorded the statement of DCP Raju Bhujbal in connection with the alleged corruption case against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#ED(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x