22 February 2025 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

नोकरीवर EPF कापला जातो? | बॅलेन्स चेक करा | EPFO कर्मचाऱ्यांकडून २१ कोटींची हेराफेरी

EPFO

मुंबई, १८ ऑगस्ट | EPFO च्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्च २०२० ते जून २०२१ या कोरोना संकटाच्या कालावधीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधातून २१ कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कॉमन पीएफ पूलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. यापैकी सुमारे २१ कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासानुसार घोटाळ्याचा मास्टरमाइंड मुंबई कांदिवली ईपीएफओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे, ज्याने पीएफ दावा करण्यासाठी स्थलांतरित कामगाराच्या ८१७ बँक खात्यांचा कथितपणे गैरवापर केला होता. या पीएफ खात्यातून एकूण २१.५ कोटी रुपयांची हेराफेरी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या पैशांपैकी ९० टक्के रक्कम काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याशिवाय मुंबई कार्यालयातील ५ कर्मचारी या फसवणुकीमध्ये सामील आहेत, त्यापैकी मुख्य आरोपी फरार आहेत. अंतर्गत लेखापरीक्षण पूर्ण होताच ईपीएफओ हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार असल्याचे सांगितले जात आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, जर तुमचे UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या ताज्या योगदानाची आणि PF शिल्लक माहिती एका मेसेजद्वारे मिळवू शकता. उमंग अॅपद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक देखील तुम्ही तपासू शकतात. तुम्ही ईपीएफओ वेबसाईटद्वारे बॅलन्स देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO ​​पासबुक पोर्टलवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या यूएएन आणि पासबुकने लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला डाऊनलोड व्ह्यू पासबुक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: EPFO clerk siphoned rupees 21 crore through nexus in Mumbai Kandivali office scam news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x