मुंबई पोलिसांपुढे रिपब्लिकची धाकधूक | चौकशीला गैरहजेरी | न्यायालतात धाव
मुंबई, १० ऑक्टोबर : टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज त्यांना मुबई पोलिसांपुढे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहायचे होते. मात्र मुंबई पोलिसांची आक्रमक कारवाई बघता रिपब्लिक टीव्ही वाहिनीवर देखील दडपण असल्याचं पाहायला मिळालं आहे.
समन बजावण्यात आलेलं तरी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शनिवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. मुंबई पोलिसांनी थेट रिपब्लिक टीव्हीच्या बँक अकाऊंटची चौकशीपर्यंत हात घातल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यामुळे CFO शिवा सुब्रमण्यम सुंदरम मुंबई पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर झाले नाहीत असं वृत्त आहे. डेक्कन क्रॉनिकलने याबाबत वृत्त दिलं आहे.
मात्र दुसरं वृत्त हाती आल्याप्रमाणे रिपब्लिकचे सीएफओ पुढील काही दिवस मुंबईबाहेर असल्याने आणि त्यांच्या उपलब्धतेनुसार म्हणजे १४ ते १५ ऑक्टोबर, २०२० दरम्यान सदर चौकशीबाबत हजर राहू असं मुंबई पोलिसांना कळवलं आहे.
दरम्यान, टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत. यात हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा उद्या (शनिवारी) आणखी 6 जणांची चौकशी करणार आहे. विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक) आणि घनश्याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.
News English Summary: Despite summons, Republic TV’s Chief Financial Officer (CFO) did not appear before the Mumbai police on Saturday to record his statement in connection with the TRP manipulation racket, saying the channel has approached the Supreme Court in the case, a senior official said. Shiva Subramaniyam Sundaram, the channel’s CFO, against whom summons had been issued on Friday, also requested the police not to record his statement saying the top court’s hearing is scheduled within a week, the official said.
News English Title: Fake TRP scam Republic TV CFO do not appear before Mumbai police to record statement Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय