30 April 2025 6:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका
x

छोटा शकीलचा भाऊ अन्वरविरोधात गुन्हा दाखल | परमबीरवर एका बिल्डरकडून वसुली केल्याचा आरोप | SIT तपास सुरु

Parambir Singh

मुंबई, १६ ऑगस्ट | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणी वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. या तपासात अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे उघड होत आहे. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंड छोटा शकील याचा भाऊ अन्वर याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच इतर दोन जणांवर वसुलीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांच्या वसूली प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. एसआयटीच्या हाती फरार गुंड छोटा शकील यांचा एका ऑडिओ लागलेला आहे. या ऑडिओमध्ये शकील एका बिल्डरला धमकी देत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या प्रकरणात दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा ऑडिओ समोर आल्यानंतर अन्वरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लीप:
ही ऑडिओ क्लीप 2016 तील असून परमबीर सिंह त्यावेळी ठाणे पोलिस आयुक्त होते. या ऑडिओमध्ये छोटा शकील संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी देताना दिसत आहे. दरम्यान, शकील संजयला दुसरा बिल्डर श्याम सुंदर अग्रवालसोबत सेटलमेंट करायला सांगतो.

श्याम सुंदर यांनी परमबीर गुन्हा दाखल केला होता:
बिल्डर शाम सुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंग यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरील प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केल्या जात आहे. परमबीर सिंग यांनी त्यांना बनावट प्रकरणात गोवले असून त्यांच्याविरोधात MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे श्याम सुंदर अग्रवाल यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परमबीर सिंग आणि त्यांच्या काही सहकारी पोलिसांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली नाहीतर त्यांना सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली पैसेही उकळले असल्याचा आरोप श्याम सुंदर यांनी केला.

कोण आहेत श्यामसुंदर अग्रवाल ?
श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंहसह अन्य सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘परमबीर सिंह यांनी मला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवले आहे. परमबीर यांनी माझ्यावर मकोका लावला होता, असेही या तक्रारीमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांनी नमूद केले आहे. परमबीर सिंह यांच्यासह त्यांच्या काही पोलीस साथिदारांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त होते, तेव्हा माझ्याकडून त्यांनी जबरदस्ती पैशांची वसुली देखील केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Case filed against Chhota Shakeels brother Anwar Parambir is accused of recovery from a builder SIT is investigating news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony