20 April 2025 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

सरकारच्या धोरणांशी सहमत नाही म्हणून नागरिकांना तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही - न्यायालय

Finally court, Granted bail, Toolkit case, Disha Ravi

मुंबई, २३ फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात अखेर दिशा रवीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या 9 दिवसांपासून कारागृहात राहिलेल्या दिशाला दिल्लीच्या पतियाळा येथील हाउसकोर्टाकडून एक लाखाच्या खासगी जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याच प्रकरणातील आणखी एक सह-आरोपी शांतनू मुलुकने जामीन मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाकडून टिपणी:
सदरच्या सुनावणीत न्यायालयाने अनेक टिपण्या करून पोलीस आणि सरकारला सुनावले आहे. सरकारच्या धोरणांशी सहमत नाही म्हणून नागरिकांना तुरुंगात टाकलं जाऊ शकत नाही अशी टिपणी करत सरकारला सुनावले आहे. पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

कोर्टाने पुरावे मागितले होते:
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार आणि टूलकिटचा संबंध काय अशी विचारणा करताना पोलिसांना पुरावे मागितले होते. त्यावर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. भारताला जागतिक पातळीवर बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रात दिशाचा हात आहे. तिने शेतकरी आंदोलनांच्या आडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असा दावा सुद्धा पोलिसांनी कोर्टात केला होता. एवढेच नव्हे, तर दिशा टूलकिट प्रकरणाव्यतिरिक्त खलिस्थानी वकिलांच्या संपर्कात होती. खलिस्थानी संघटनेंना दिशाचा वापर केला असे पोलिसांनी आरोप केले. पण, दिशाच्या वकिलांनी ते स्पष्टपणे फेटाळून लावले.

दिशाला टूलकिट प्रकरणात यापूर्वीच पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पोलिसांनी तिच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करावी अशी मागणी केली होती. पण, महानगर न्यायाधीशांनी तिच्या रिमांडमध्ये एका दिवसाची वाढ केली. त्यामुळे, पोलिसांनी आज दिशा आणि निकितासह मुकुल यांची समोरासमोर चौकशी केली. दिशाने आपल्यावर लागलेले सर्व आरोप शांतनु आणि निकितावर ढकलले त्यामुळे त्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असे पोलिसांनी कोर्टाला सांगितले आहे.

दिशाला दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. दिल्ली पोलिसांचा आरोप होता, की फ्राइडे फॉर फ्यूचर मोहिमेची सुरुवात करणारी दिशा हिनेच टूलकिट बनवून ते पसरवले होते. तिने यासाठी सोशल मीडिया ग्रुप सुद्धा बनवले होते. हीच टूलकिट पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियावर शेअर केली होती.

 

News English Summary: Disha Ravi has finally been granted bail in a toolkit case related to the farmers’ agitation. Direction, who has been lodged in jail for the last nine days, has been granted bail by the House Court in Patiala, Delhi on a private caste bond of Rs one lakh. Shantanu Muluk, another co-accused in the same case, filed a petition in the court seeking bail. It is now expected to be heard on Wednesday.

News English Title: Finally court has been granted bail in a toolkit case related to the farmers’ agitation to Disha Ravi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या