22 November 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

केवळ प्रामाणिक पत्रकारांना छळलं जातंय | मनदीप पुनिया यांच्या पत्नीचा आरोप

FIR filed, Journalist Mandeep Punia, Farmers Police

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनाची जनपथ या संकेतस्थळावर सलग दोन महिने माहिती देणाऱ्या स्वतंत्र पत्रकार मनदीप पुनिया यांना ३१ जानेवारी रोजी दुपारी १-दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतसुनावत थेट तिहार तुरुंगात पाठविण्यात आले. दरम्यान स्वतंत्र पत्रकार मनदीप पुनिया यांना दिल्लीच्या कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

30 जानेवारी रोजी संध्याकाळी सिंगू सीमेच्या बातमीदरम्यान त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पुनियाशिवाय ‘ऑनलाइन न्यूज इंडिया’ वेबसाइटशी संबंधित पत्रकार धर्मेंद्र सिंह यांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याला सोडण्यात आले आहे.

पुणियावर पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन आणि सरकारी कामात अडकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार मनदीपविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरसंदर्भात त्यांच्या पत्नी लीलाश्री म्हणाल्या की, “मनदीपच्या अटकेचा व्हिडिओ तुम्ही पहिला असेल, ज्यामध्ये मनदीप पोलिसांशी हुज्जत घालत नव्हता तर पोलिसच त्यांना खेचत होते हे स्पष्ट दिसत आहे. वास्तविक त्यांना त्यांच्या प्रामाणिक पत्रकारितेची शिक्षा मिळत आहे. ते सलग दोन महिने शेतकऱ्यांचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत होते. मागील काही वर्षांपासून केंद्र सरकारवर सतत प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्रकारांना छळलं जातंय. त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्या. पण लोक किती वेळ गप्प बसतील?” असा थेट सवाल देखील मनदीप पुनिया यांच्या पत्नी लीलाश्री यांनी उपस्थित केला आहे.

 

News English Summary: Independent journalist Mandeep Punia, who has been providing information on the Janpath website of the farmers’ movement for two consecutive months, was sent to Tihar Jail on January 31 in a 1-day judicial remand. Meanwhile, independent journalist Mandeep Punia has been remanded in judicial custody for 14 days by a Delhi court. He was arrested by the Delhi Police on the evening of January 30 during the Singu border news. Apart from Punia, Dharmendra Singh, a journalist associated with the Online News India website, was also arrested. However, he has been released.

News English Title: FIR filed against independent journalist Mandeep Punia news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x