16 April 2025 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री असतानाच परमबीर सिंग स्वतःच्या बंगल्यावर करोडोच्या खंडण्या आणि प्लॉट हडपायचे - सविस्तर वृत्त

Parambir Singh

मुंबई, २३ जुलै | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यात आज गुन्हा दाखल होण्यापूर्वी गुरुवारी देखील मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपातून मुक्त करून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासहित सात जणांविरुध्द मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना परमबीर सिंग यांची मार्च २०१५ मध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती आणि तेव्हापासून ते स्वतःच्या बंगल्यावरच श्रीमंत गुन्हेगारांना खोट्या गुन्ह्यात अडकवून करोडोच्या खंडण्या आणि करोडोच्या जमिनी नावावर करून बळकवायचे असं वृत्त समोर आलं आहे. ठाण्याचे आयुक्त असताना खोट्या गुन्ह्यात अडकून एकाकडून ४.६८ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे निम्मी रक्कम ठाण्यातील त्याच्या तत्कालिन शासकीय बंगल्यात वसूल करून घेतली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या ८ कोटीचा भूखंड जबरदस्ततीने केवळएक कोटीला खरेदी खत बनवून घेतला आहे. या प्रकरणी परमबीर यांच्यासह तत्कालीन ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त व सध्या मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पुनामिया,सुनील जैन, मनोज घोटकर अशी अन्य आरोपींची नावे आहेत. शरद मुरलीधर अग्रवाल या बिल्डरने त्याच्याविरुद्ध कोपरी स्वतः कोपरी पोस्टे, गुन्हा क्रमांक – 176/2021 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयमध्ये कोपरी पोलीस स्टेशन मध्ये. दिनां २३/०७/२०२१ रोजी रात्री फिर्यादी शरद अग्रवाल यांचेंकडुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन गु. र. क्र. १७६/२०२१ भादंवि ३८४, ३८५,३८८,३८९,४२०,३६४ अ, ३४ १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.परमबीर सिंग यांचे सोबत संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपी आहेत व पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे ( गुन्हे) करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: FIR registered against Parambir Singh in Thane over extortion case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या