24 November 2024 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

भंडारा | शिशु केअर युनिटच्या अग्नितांडवात १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू | चौकशीचे आदेश

Fire broke out, Bhandara District, children dead

भंडारा, ९ जानेवारी: नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या दक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळं अचानक आग लागली. त्यात दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्र हादरला असून सरकारी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून तपासाचे निर्देशही दिले आहेत.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

 

News English Summary: The neonatal intensive care unit at Bhandara District Hospital caught fire due to a short circuit at midnight on Friday. Ten Chimukals died on the spot. Maharashtra is shaken by this incident and the security system in government hospitals is being questioned. Chief Minister Thackeray has taken serious note of this incident.

News English Title: Fire broke out in Bhandara District hospital many children dead short circuit news updates.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x