22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती

Anil Deshmukh

मुंबई, २९ जून | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिह‍िलेल्या पत्रात आपले वाढते वय आण‍ि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट म‍िळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.

दरम्यान, तीन पानांच्या पत्रात अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात नोंदवलेल्या ईसीआयआरची प्रतही मागितली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणात “मनी लाँडरिंग” चा गुन्हा दाखल करत संबंध‍ित प्रकरणाची चौकशी करत आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अन‍िल देशमुख यांना 25 जून आण‍ि 29 जूनला चौकशीसाठी बोलावले होते.

ईडीने देशमुख काही द‍िवसांपूर्वी देशमुख यांच्या मुंबई आण‍ि नागपुरातील काही ठ‍िकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आण‍ि खाजगी सच‍िव दोघांना अटक केली होती. ते दोघेही सध्या ईडीच्या ताब्यात असून 1 जुलैपर्यंत रिमांडवर आहेत.

अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात काय म्हटले आहे?
* आपण पाठवलेल्या 25 जून रोजीच्या समन्सचे मी पूर्णपणे पालन केले आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह माझ्या वक‍िलांना आपल्या कार्यालयात पाठवले आहे. यानंतरदेखील माध्यमांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.
* मी एक लोकप्रिय लोकप्रिय नेता आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य लोकसेवेत घालवले आहे.
* माझ्यावरचे ज्या व्यक्तीने आरोप केले आहेत. त्यांच्यावर आधीपासून केंद्राच्या इशार्‍यावरुन काम करत असल्याचा गंभीर आरोप आहे.
* मला स्वतःच या आरोपामागील खोटारडेपणा उघडायचा असून त्यासाठी मला ईसीआयआरची प्रत उपलब्ध करुन द्यावी. कारण योग्य कागदपत्रांशिवाय मला आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास देता येणार नाही.
* माझे वाढते वयाला कोरोनाचा धोका न‍िर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Former home minister Anil Deshmukh letter to ED for absent to inquiry news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x