22 January 2025 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

Param Bir Singh | होमगार्ड्स बदली पासून रजेवर | आता फोन बंद | ठाणे पोलीस पुढच्या तयारीला...

Parambir Singh

ठाणे, १९ ऑगस्ट | ठाणे पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ५ दिवसांनी, सूत्रांनी सीएनएन न्युज18 ‘ला ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांची होमगार्ड्सचे डीजी म्हणून बदली झाली, तेव्हापासून सिंग आता ४ महिन्यांपासून रजेवर आहेत.

होमगार्ड्सचे डीजी परमबीर सिंग ४ महिन्यांपासून रजेवर (Former Mumbai Police commissioner Param Bir Singh is not reachable) :

ठाणे पोलिसांचे तपास पथक आता सिंग यांनी काही आठवड्यांपूर्वी सादर केलेल्या त्याच्या ठावठिकाण्याबाबत आणि वैद्यकीय अहवालांची पडताळणी करत आहे. “सिंग यांचा फोन नंबर बंद आहे. आम्ही कायदेशीर पर्याय शोधत आहोत, असे ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिसाने सीएनएन न्युज18’ला सांगितले.

परमबीर सिंग यांना कथितपणे चंदीगडच्या बाहेर जाण्यास मदत केल्याबद्दल काही राजकारणी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांनी सादर केलेले काही वैद्यकीय अहवाल आहेत. हे खरे की खोटे आहेत याची शहनिशा करणार आहोत आणि पडताळून पाहत आहोत. ज्या डॉक्टरांनी ते जारी केले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत, असे एका तपास अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

चांदीवाल आयोगाकडून दंड:
परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Committee) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर उपस्थित न झाल्याने परमबीर सिंह यांना पंचवीस हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. यासाठी सरकारद्वारे एक सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former Mumbai Police commissioner Param Bir Singh is not reachable news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x