23 February 2025 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट | गोएअरच्या पायलटला नोकरीवरून काढून टाकले

Go Air, fires senior pilot, Tweeting against PM Modi

नवी दिल्ली, १० जानेवारी: समाज माध्यमांवरील टिपण्या सध्या अनेक वादांना तोंड फोडत आहेत. त्यात जर संबंधित टिपणी राजकीय व्यक्ती विरोधात असेल तर प्रकरण अधिक गंभीरपणे घेतलं जातं. मध्यंतरी अर्णब गोस्वामी यांच्या संबंधित याचिकेवरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाला नुसरून अनेक टिपण्या केल्या होत्या.

राज्यघटनेमध्ये पार्ट तीन हा मूलभूत अधिकारांसंबंधी आहे. त्यातील अनुच्छेद १९ हा स्वातंत्र्याचा अधिकार देतो. त्यातील अनुच्छेद ‘१९(१) अ’ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपल्याला अधिकार देतो. काही मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिक असो किंवा नसो, सर्वांना लागू आहेत. पण मूलभूत अधिकारातील स्वातंत्र्याचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. यामध्ये बोलण्याचा आणि अभिव्यक्ती या स्वातंत्र्याचा समावेश आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं तात्काळ पायलटला कामावरून काढून टाकले. पंतप्रधानांविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. त्यानंतर मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.

 

News English Summary: Mickey Malik is the name of the pilot who was fired by GoAir. Mickey Malik had criticised Prime Minister Modi by tweeting. The company took the action in protest of Malik’s tweet. “The prime minister is an idiot. You can call me stupid too. I will not feel bad. Because, I am not the Prime Minister. But the Prime Minister is an idiot, “Malik tweeted. Many then expressed outrage at Malik’s tweet. Malik tweeted after the controversy arose. He also apologised. He also locked his Twitter account.

News English Title: Go Air fires senior pilot for tweeting against PM Narendra Modi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x