22 December 2024 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

भाजपा खासदाराच्या ”तसल्या” कथित व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ

gujarat

अहमदाबाद, १२ ऑगस्ट | समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. परंतु, तत्पूर्वीच हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे. मात्र परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्या मुलाने पोलिसांमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

या व्हिडीओबाबत बनासकांठा येथील आम आदमी पक्षाचे नेते मधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कुणाचाही फोटो दिसत नव्हता. मात्र मधाभाई यांनी ते भाजपाच्या या नेत्याचा संपूर्ण व्हिडीओ १५ ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुकवर शेअर करणार असल्याचा दावा केला होता.

त्यांचा दावा आहे की त्यांचा आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्याच्या हेतूने कोणत्यातरी व्हिडिओशी छेडछाड करून तयार करण्यात आला आहे. पटेल यांनी मुलीची ओळख करण्यासही नकार दिला आहे. ते म्हणाले की यापूर्वीही त्याला ब्लॅकमेल आणि बदनाम करण्याचे प्रयत्न झाले आहेत. “मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही वाईट काम केले नाही. माझा फोटो एडिट करून तेथे लावला गेला असल्याची शक्यता आहे. असे पटेल यांनी मांडले.

दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परबत भाई पटेल यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये खासदार एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत बसलेले दिसत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gujarat alleged Sex Video Of BJP MP file a complaint against AAP Leader news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x