23 December 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

वाहतूक पोलिसाला मारहाण | सादविका तिवारी आणि मोहसीन खानला अटक

Hands raised, on duty Mumbai traffic Police, woman caught

मुंबई, २४ ऑक्टोबर : काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती.

याप्रकरणी एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 571/2020 भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. सदर प्रकरणी सादविका रमाकांत तिवारी (वय 30 वर्ष – मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (वय 26 वर्ष – भेंडी बाजार) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सादविका आणि खान यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात आले आहे.

 

News English Summary: A woman’s Gundagardi was seen at the Cotton Exchange Naka in Kalbadevi area. The woman allegedly beat up a traffic policeman. The chucky woman grabbed the collar and put it on the earlobe. In this case, LT Marg police have handcuffed him. A case has been registered against Sadvika Ramakant Tiwari (30) of Masjid Bunder and Mohsin Nizamuddin Khan (26) of Bhendi Bazar.

News English Title: Hands raised on duty Mumbai traffic Police woman caught News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x