कोंबड्यांचा ट्रक उलटला | आजूबाजूच्या कोंबडीचोरांकडून ३०० कोंबड्यांची लूट
भोपाळ, २९ डिसेंबर: आपल्या देशात एखादी फुकट मिळविणार असेल तर तुटून पडण्याची संधी लोकं अजिबात सोडत नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्यात विषय पोटपूजेशी संबंधित असेल तर विचारायला नको. तसाच प्रकार मध्य प्रदेशातील बडवाणी भागात घडला आहे. झालं असं की कोंबड्यांची माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आणि ट्रक उलटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी अर्ध्या मृत्युमुखी पडल्या, तर 300 ते 400 कोंबड्यांची जमलेल्या कोंबडीचोरांकडून लूट करण्यात आली. मध्य प्रदेशातील बडवानी भागात कोंबड्यांची वाहतूक करणारा पिक अप ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यामुळे झालेल्या अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेल्या काही कोंबड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दरवाजे तुटल्याने मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांनी बाहेरच्या परिसरात आसरा घेतला.
मात्र काही वेळातच कोंबड्यांच्या ट्रकला झालेल्या अपघाताचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर काही वेळातच परिसरातील नागरिक कोंबड्यांना पळवण्यासाठी घटनास्थळी जमा झाले. एकट्या वाहनचालकाचं गर्दीपुढे काही चालेना. कोंबड्या लुटण्यासाठी काही जण बाईकवर स्वार होऊन आले होते. हाताला लागतील तितक्या कोंबड्या धरुन नागरिक पसार झाले.
News English Summary: It has been seen many times that if you want to get something for free in your country, people do not miss the opportunity to break up. Don’t ask if the subject is related to potpourri. The same thing has happened in Badwani area of Madhya Pradesh. It so happened that a truck transporting chickens had an accident and after the truck overturned, there was a huge crowd of citizens around.
News English Title: In Madhya Pradesh pickup truck full of chickens overturned on road people gathered for loot news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today