खा. मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू | मुंबईतील हॉटेलमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
मुंबई, २२ फेब्रुवारी: दादरा व नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू झाला आहे. ते 58 वर्षांचे होते. मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असावी असे सांगितले जात आहे. परंतू, पोलीस मात्र अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.
मोहन डेलकर हे दादरा व नगरहवेली येथून अपक्ष खासदार होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा खासदार बनले. लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा अपक्ष खासदार म्हणून निवडूण आले. मोहन डेलकर यांनी भारतीय नवशक्ती पक्षाच्या माध्यमातनही लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते निवडूणही आले होते. सन 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडूण आले होते. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मात्र ते अपक्ष लढले आणि निवडूणही आले.
मोहन डेलकर यांचा राजकीय इतिहास पाहता ते पक्ष बदलण्या वाक्बर होते. त्यांनी अनेक पक्षांत प्रवेश केला. मात्र, कोणत्याच पक्षात ते स्थिर होऊ शकले नाहीत असे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरुन लक्षात येते. असे असले तरी त्यांना राजकीय यश मात्र मिळत गेले. ते अनेक निवडणुका जिंकले. 2004 मध्ये त्यांनी भारतीय नवशक्ति पार्टी , फेब्रुवारी 2009 मध्ये काँग्रेस, तर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. नवशक्ती पार्टी, काँग्रेस आणि आता अपक्ष असे ते निवडूण आले. गेल्या वर्षी (2020) त्यांनी जनता दल यूनायटेड पक्षात प्रवेश केला होता.
News English Summary: Independent MP Mohanbhai Delkar from Dadra and Nagar Haveli Lok Sabha constituency has died. He was 58 years old. His body was found in a suspicious condition in a hotel in Mumbai. It is unknown at this time what he will do after leaving the post. Mumbai Police have rushed to the spot after getting information about the incident. Preliminary estimates suggest it was a suicide. However, the police have not yet reached any conclusion.
News English Title: Independent MP Mohanbhai Delkar from Dadra and Nagar Haveli Lok Sabha constituency has found died news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो