22 November 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सँडविच खाण्यावरून ATS अधिकाऱ्याशी वाद​​​​​​​ | ATS Vs क्राईम ब्रांच वादात विरोधक आणि NIA'ला इनपुट दिलं?

Sachin Vaze, Crime Branch, ATS

मुंबई, १६ मार्च: सध्या समोर येतं असलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे असंच म्हणावं लागेल. अटक होण्याच्या अनेक दिवस आधी सचिन वाझे यांनी मला माझे सहकारीच अडकवू इच्छित आहेत असं व्हाट्सअँप स्टेटस ठेवलं होतं. विशेष म्हणजे अधिवेशन काळात विरोधकांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पोलीस खात्यातील दोन भिन्न विभागात पेटलेल्या अघोषित वादात काही माहिती गुप्त पद्धतीने पुरावली गेल्याची शंका उपस्थित होऊ लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पोलीस खात्यातील काही लोकं फडणवीसांना माहिती देत असल्याचा आरोप करताना राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र हा वाद ATS अधिकारी आणि क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांमधील अहंकारातून पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचे समजताच दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाझे तिथे आधीपासूनच हजर होते. ATS च्या अधिकाऱ्याने वाझे यांना ती कार कुठे आहे असे विचारले. तेव्हा वाझे आरामात सँडविच खात होते. त्यांनी एका पोलिसाला बोलावून साहेबांना ती कार दाखव असे आदेश दिले. या त्यांच्या वागण्यावरून ATS अधिकारी आणि वाझेंमध्ये खटका उडाला. सचिन वाझेंच्या या वागण्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचे समजते. खरेतर एटीएसच्या अधिकाऱ्यांना वाझेंनीच स्वत: जाऊन घटनास्थळाची माहिती देणे गरजेचे होते. मात्र, प्रोटोकॉल न पाळता त्यांनी पोलिसाला आदेश देत स्कॉर्पिओ दाखविण्यास सांगितल्याने वाद झाला होता. इथेच सचिन वाझेंनी अडकविण्याचा अघोषीत प्लान रचला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. त्यात NIA’ला विशेष काही न करताच या अंतर्गत वादात सर्व माहिती पुरवली गेल्याची शंका व्यक्त करण्यात येतं आहे. कारण NIA टीमने राज्य ATS कार्यालयात हजर राहून सर्व माहिती घेतली होती.

विधानसभेमध्ये अधिवेशनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सर्वात आधी घटनास्थळी गेले होते, असा आरोप केला होता. त्यावर वाझेंनी आपण नंतर गेल्याचे सांगितले होते. आता वाझे एनआयएच्या ताब्यात गेल्यानंतर हळूहळू तेव्हा घडलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. या साऱ्या गुन्ह्याचे सूत्रधार सचिन वाझेच असल्याचे समोर आले आहे. एनआयएने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ तिथे सोडून ज्या इनोव्हाने चालक पळून गेला ती इनोव्हादेखील ताब्य़ात घेतली आहे. ही इनोव्हा मुंबई पोलिसांचीच असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता वाझेंचे काही सहकारी देखील अडकले असून कोठडीमध्ये आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादात संपूर्ण क्राईम ब्रांच टीमला लक्ष करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर त्यांनी हा सुगावा लागताच हा सर्व खटाटोप केल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

News English Summary: Anti-Terrorism Squad (ATS) officials rushed to the spot after learning that a car packed with explosives was found outside Ambani’s house. This time Waze was already there. An ATS officer asked Waze where the car was. Waze was eating sandwiches comfortably then. He called a police officer and ordered him to show the car. This led to a rift between ATS officers and Wazen.

News English Title: Internal war between ATS and Mumbai Crime Branch targets Sachin Vaze news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x