5 November 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

TRP घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट | त्यापैकी एक वृत्तवाहिनी

TRP Scam, Mumbai Police, Arnab Goswami, Republic TV

मुंबई, २२ ऑक्टोबर : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. यापैकी एक वृत्तवाहिनी असल्याचे सांगण्यात आले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असून याप्रकरणी नोंद गुन्ह्य़ात पुरावा नष्ट करणे, पुरावा म्हणून वापर होईल अशी कागदपत्रे नष्ट करणे, समन्स किंवा नोटिशीतील सूचना न पाळणे आणि चौकशीस सहकार्य न करणे आदी कलमे वाढविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे उच्च न्यायालयाने देखील सुशांतसिंग प्रकरणात रिपब्लिक वृत्तवाहिनीला झापले असून अनेक प्रश्न देखील केले आहेत. एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू असताना कोणाला अटक करावी, हे लोकांना विचारून एखाद्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे ही कसली शोध पत्रकारिता, असा सवाल करत उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

सुशांत आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या वृत्ताबाबत व रिया चक्रवर्तीविरुद्ध चालवलेली हॅशटॅगची मोहीम इत्यादींचा उल्लेख मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने यावेळी केला. रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या मृतदेहाचे फोटो का दाखविले? त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, असे का पसरवले? असे सवाल न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीच्या वकील मालविका त्रिवेदी यांना केले. हत्या की आत्महत्या, याबाबत तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्ही सुशांतची हत्या झाल्याचे कसे म्हणतो? ही शोधपत्रकारिता आहे का? असे सवालही न्यायालयाने केले. सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी मर्यादा पाळाव्यात, अशी मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत.

 

News English Summary: The Crime Branch on Wednesday claimed that two more channels were involved in the TRP scam. One of these was said to be a news channel. The Special Investigation Team (SIT) of the Crime Branch is investigating the TRP scam.

News English Title: Involvement Of Two More Channels In The TRP Scam Is Clear said Mumbai Police News Updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x