27 April 2025 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेला अखेर इंदूरमधून अटक | बडे मासे गळाला लागणार

BHR Scam

मुंबई, २९ जून | भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. दाढी, मिशी वाढवून रूप बदलवण्याचा प्रयत्न करूनही इंदूर परिसरातील एका जुनाट वसतिगृहाजवळ त्याला ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो जिथे राहत होता तिथे काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्यासह बुधवारी त्याला पुण्याच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.

नोव्हेंबर २०२० च्या २४ तारखेला पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर २५ तारखेला पोलिसांनी जळगावमध्ये धरपकड केली होती. त्याची आधीच भनक लागल्याने जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर हे दोन प्रमुख संशयित आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलिस कंडारेच्या मागावर होते. त्याची सासुरवाडी इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यामुळे पुणे पोलिसांचे एक पथक तिथे लक्ष ठेवून होते. मध्यंतर कंडारे कुटुंबातील एक लग्नही इंदूरला झाले; पण तिथे हा संशयित आरोपी न आल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला नाही.

तो इंदूरमधील एका होस्टेलमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पूर्ण खात्री केल्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला पोलिसांनी पकडले. दुपारी आणि रात्री असे दोनच वेळा तो जेवणासाठी म्हणून त्या होस्टेलच्या इमारतीच्या खाली उतरत होता. काल रात्रीही तो जेवणासाठी म्हणून खाली आला आणि पोलिसांच्या हाती लागला. कंडारे याचे गेल्या सहा महिन्यांत वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यातच त्याने दाढीही वाढवली असून मिशाही वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचे नोव्हेंबरमधले रूप पार पालटून गेले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हे रूपांतर करून घेतले होते.

जितेंद्र कंडारे याला सन २०१५ मध्ये पतसंस्थेचा अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर त्याने कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र, कर्जदार आणि दलाल यांना हाताशी धरून कंडारे याने आपल्या पदाचा आणि अधिकारांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. कर्जाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात ठेव पावत्या स्वीकारून बेकायदा व्यवहार केले. बनावट वेबसाइट तयार करून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्या. त्यामुळे अनेक ठेवीदार देशोधडीला लागले.

BHR घोटाळा आणि भाजप कनेक्शन:
दरम्यान भाईचंद हिराचंद रायसोनी अपहाराचा फरार असलेला मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्ती असल्याचं समजतं. त्यातच सुनील झंवरकडे केलेल्या छापेमारीत गिरीश महाजन यांचं लेटर हेड आढळून आलं होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Jalgaon BHR Scam Jitendra Kandare is finally arrested in Indore news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या